लोहारा व उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व भुईमुग या पिकांचा पिक विमा द्यावा,



  • लोहारा तालुका कॉग्रेसची जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा व उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व भुईमुग या पिकाला पिक विमा दिला नाही तरी प्रशासनाने व विमा कंपनीने पुन्हा पंचनामे करुन या पिकाचा पिक विमा देण्यात यावा,अशी मागणी लोहारा तालुका कॉग्रेस पार्टीने निवेदनाद्वारे लोहारा तहसीलदार मार्फत उस्मानाबाद जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,लोहारा व उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन व भुईमुग या पिकावर संरक्षण मिळवण्यासाठी कार्यालयाकडे आवश्यक असणारी विमा बाबत रक्कम भरली होती.शासनाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पिक विमा मिळणाऱ्या पिकांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये सोयाबीन व भुईमुग या पिकांचा उल्लेख नाही.जिल्ह्यातील लोहारा तालुका कमी पर्जन्यमान क्षेत्र म्हणुन शासनाने जाहीर केले आहे.2017 — 2018 च्या खरीप हंगामात अपेक्षेपेक्षा  खुपच कमी पाऊस झाला आहे.त्यातच पाऊस झाला तो काळ पिक वाढीसाठी उपयुक्त नव्हता.त्यामुळे हाताशी आलेले शेतकऱ्यांचे सोयाबीन व भुईमुग हे पिक उत्पन्न देवु शकले नाही.पिकांच्या संरक्षणासाठी दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांनी शासनाच्या पिक विमा योजने अंतर्गत वेळेत पैसे भरले आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिरंगाई व आयोग्य पध्दतीने करण्यात आलेले पंचनामे व निष्काळजीपणा शेतकऱ्यांसाठी हाणीकारक ठरत आहे.शासकीय आकडेवारीनुसार प्रति हेक्टर 1091 किलो उत्पन्न दाखविण्यात आले आहे.ते पुर्णपणे चुकीचे आहे.2017 च्या खरीप हंगामात पिक कापणी प्रयोगात दोन तालुक्यात सोयाबीन उंबरठा उत्पादन अधिक दाखवल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला विमा मिळाला नाही.
परिणामी शेतकऱ्यांचे 60 कोटीहुन अधिक नुकसान झाले आहे.तरी जिल्हाअधिकारी यांनी पिक विमा कंपनी व महसुल यंत्रणेने केलेल्या पिक विमा कापणी प्रयोगाची नव्याने तपासणी करावी.त्यात दोषी असणाऱ्यावर कार्यवाही करुन विम्यापासुन वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवुन द्यावा.तसेच जिल्हाअधिकारी यांनी निवासी उपजिल्हाअधिकारी मार्फत या प्रकरणाची तपासणी केली.त्यात पिक कापणी प्रयोगादरम्यान केलेल्या पंचनाम्यावर स्वाक्षरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे जवाब घेतले.या जवाबात कांही शेतकऱ्यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे विमा कंपनी व महसुल प्रशासनाच्या झालेल्या पंचनाम्याबाबत व कापणी प्रयोगाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर कॉग्रेस तालुका अध्यक्ष अमोल पाटील,तालुका समन्वय माजी तालुका अध्यक्ष नागण्णा वकील,सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे,बाळु लोभे,चंद्रकांत फावडे,प्रकाश गरजे,
पांडुरंग शेगजी,शरणप्पा वाले,विजय गुळवे,
बाबासाहेब चव्हाण,यांच्यासह कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post