मूर्तिजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल ८८.४ टक्के




  • सहा शाळांचा निकाल १००% ; प्राविण्य श्रेणीत ५३९ आणि प्रथम श्रेणीत ८८४ विद्यार्थी

रिज़वान सिद्दीकी
मूर्तिजापूर,ता.८ :  या तालुक्याचा दहावीचा निकाल ८८.०४ टक्के लागला असून तालुक्यातील ५४ शाळांमधून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या २७४४ पैकी २४१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील ५३९ प्राविण्य श्रेणीत, ८८४ प्रथम श्रेणीत, ८३७ द्वितीय श्रेणीत, तर केवळ १५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत.
        व्यंकटेश बालाजी कॉन्व्हेंट, स्व.परमानंद मालाणी कॉन्व्हेंट, अष्टविनायक कॉन्व्हेंट, मंगरुळ कांबे येथील स्वामी विवेकानंद विद्यालय, कानडीचे ज्ञानप्रकाश विद्यालय आणि शेलू वेताळ येथील अनुसूचीत जातीच्या मुलांची शासकीय निवासी शाळा या सहा शाळांचा निकाल शंभर टक्के आहे.  सर्वात कमी निकाल जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाचा ४४.४४ % आहे.
          उर्वरीत शाळांच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. मूर्तिजापूर हायस्कूल ९३.४७, गाडगे महाराज ८१.४८, इं.गां.न.प.४६.८७, जे.बी.न.प. ४८.७१, सिद्धार्थ ६९.४४, भारतीय ज्ञानपीठ ९०.६०, सेंट आन्स ९९.१७, आदर्श कन्या ८९.७४, गुलाम नबी आझाद ९२.४५, सरला राम काकाणी ९७.७७, मदिना उर्दू ८३.८७, ज्युबिली इंग्लीश स्कूल ९५.८३, नॕशनल उर्दू ९३.५४, गोरेगावचे अंबामाता विद्यालय ९७.५०, लाखपूरीचे अर्चना विद्यालय ८१.६६, मान्याचे जि.प ८८.१३, अनवर उर्दू ९६.१५, दूर्गवाड्याचे प्रतिभा तिडके ८४, कुरूमचे पंचशील ६६.११, जामठीचे जवाहर ७१.९१, धाबेकर ९७.१४, दहातोंड्याचे सुनिल राठोड ९०.५४, हातगावचे वसंतराव नाईक ९८.३८, संजय राठोड ९८.९०, शेलू बाजारचे विद्याभारती ९८.०३, बपोरीचे लाल बहादूर शास्त्री ९४.५९, हिरपूरचे जयाजी ८६.४०, ब्रम्हीचे ज्योतिबा फुले ८४.९०, सिरसोचे स्वामी विवेकानंद ८९.७४, बोर्ट्याचे प्रा.मेंढे ९८.११, खापरवाड्याचे स्व.पुष्पाताई कांबे ८०, भटोरीचे नितिन ९७.१४, घुंगशीचे देवकाबाई पाटील ९६.९६, उनखेडचे टापरे ९६.५५, कंझराचे छगन भुजबळ ८७.८०, निंभ्याचे विठ्ठल रुखमाई ८३.३७, हिवरा कोरडेचे मातोश्री सुशीलाबाई देशमुख ८२.७५, मधापुरीचे स्वामी विवेकानंद ८७.५०, अनभो-याचे भाऊसाहेब बिडकर ९२.१०, सोनोरीचे नॕशनल उर्दू ८३.३३, इमाम वलीउल्लाह ८१.२५, कवठ्याचे बाळासाहेब ठाकरे ९५.३४, उमरीचे उर्दू माध्यमिक ९६, किनखेडचे गुलाबराव बांबल ८६.२५, जांभ्याचे संत नामदेव माहाराज ९५.२३, बोरगांवचे पुंडलिक महाराज ८८.०९ आणि पारदच्या संकेत कांबे विद्यालयाचा निकाल ६० टक्के लागला आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post