पूर्णा/प्रतिनिधी : - लग्न होऊन एक महिनाही झाला नसताना काही दिवसाचा अवधी असताना तालुक्यातिल मौजे न-हापुर येथे धुणे वाळू घालताना शॉक लागून एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि १ जून रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली.
परभणी तालुक्यातील लोहगाव येथिल कोमल हीचा विवाह दि.४ मे रोजी पूर्णा तालुक्यातील न-हापुर येथील दिपक रामा भोसले या युवकाशी झाला होता. अतिशय सुखात संसाराची सुरुवात असताना नियतीने आघात केला. शुक्रवारी विवाहिता कोमल दिपक भोसले ही दुपारी घरात धुतलेले धुणे वाळवण्यासाठी घरातील बांधलेल्या तारावार टाकत असताना त्या तारेत उतरलेल्या विद्यूत प्रवाहामुळे तीला जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला.
अचानक झालेल्या या घटनेने भोसले कुटुंबियांवर दुःखाचा पहाडच कोसळला या बाबत पोलीस पाटील उत्तम ठाकूर यांनी चुडावा पोलिसांना घटने बाबत माहिती दिली चुडावा पोलिस ठाण्याचे जमादार नामदेव सुजलोड, पोकलवार अण्णा यांनी घटना स्थळी भेट दिली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री चुडावा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
