नाला खोली करणामुळे सोनोरी गावातील जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ


  •  पाणी टंचाईच्या सावटातुन गावक-यांची सुटका  
विलास नसले
मुर्तिजापूर (प्रतिनीधी) :- वातावरणातील बदलाचा परीणाम आणि प्रदुर्षणाचा वाढत चाललेला विळखा यामुळे वातावरणात उलथा पालथ     त्रासदायक ठरत असून याचा फटका ऋतुमानांवर होत आहे. भुगर्भातील जलाशयाची पातळी झपाटयाने खाली जात असल्याने पाणी टंचाईचे मोठे वादळ निर्माण झाले आहे. अत्यल्प पावसामुळे शेतातील पिंकावर परीणाम होत असून उत्पनात घट होत चालली आहे. दुसरीकडे 300 ते 400 फुटांपर्यंत पाणी लागत नाही. या टंचाईवर मात करण्याकरीता तज्ञांसह शासन देखील विविध योजना व उपाय आमलात आण्याकरीता जणजागुती करून प्रयत्न करीत आहे.

राश्ट्रीय महामार्गावरील ग्राम सोनोरी येथे भीषण पाणी टंचाईमुळे गावक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गावातील सर्व जलस्त्रोत आटल्याने दुरवरून पाणी आणणे किंवा टॅंकरने होणारा पाणी पुरवठा यावर निर्भर राहावे लागत होते. राश्ट्रीय महामार्गाचे चैपदरी करण्याचे काम सुरू असल्याने गावाचे सरपंच सुमित राउत, तसेच उपसरपंच शेख जमील अब्दुल रशिद सर्व सदस्य, पोलीस पाटील बासीद पटेल, तंटामुक्ती अध्यक्ष षेख मुष्ताक, सचिव आर. एच. राठोड यांनी पाठपुरावाकरून नाल्याचे खोली करण्यासाठी प्रयत्न केले.


तहसीलदार राहुल तायडे यांना गावाला पाणीपुरवठा करणा-या विहीरीजवळ तलाव खोदून देण्यासाठी व नाला खोली करण व रूंदीकरण करण्यासाठी ठराव देण्यात आला होता. तहसीलदार यांनी देखील सकारात्मक भुमिका घेवून सदर काम मार्गी लागण्यासाठी सहकार्य केले. सोनोरी गावा जवळून वाहणारा शेलु ते कादवी नाला दहा फुट खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आला. मान्सून पूर्व दमदार पावसाने नाला तुडुब भरला. त्यामुळे  गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 सदर पाण्यामुळे गावातील सर्व जलाशयांच्या पातळीत वाढ झाल्याने पाणी टंचाईचे सावट पावसाळयाच्या तोंडा वरच दुर झाले .तसेच गुराढोरांच्या देखील प्रश्न मिटला आहे. या साठवणुक झालेल्या पाण्यामुळे सोनोरी गावामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जलसंधारण कामासोबतच नाले व नदया खोलीकरण भविश्यात पाणीटंचाई दुर करण्यासाठी चांगला पर्याय असल्याचे यातुन दीसून येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post