कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेच्या या आयोजनात नक्षलवाद्यांचा सहभाग होता. एल्गार परिषदेच्या या कार्यक्रमाला नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला आहे. काल सुधिर ढवळेसह पाच जणांना अटक केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता सुनावणी कोर्टात सुनावणी झाली आहे. इतर चार जणांना तीन वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल अटक केलेल्या आरोपींचे नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. नक्षलवाद्यांशी संबध याच मुद्द्यावर पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींचा कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी संबंध आहे का ? याचा तपास केला जाणार आसल्याची माहिती पुणे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
कोरेगाव-भीमा प्रकरण : एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांचा पैसा वापरला, पोलिसांना सापडले पुरावे.