अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अक्कलकोट शाखेची कार्यकारणी जाहीर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अक्कलकोट शाखेची प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.शैक्षणिक वर्षाची ज्याप्रकारे शैक्षणिक कामकाजाला सुरुवात होते.त्याच प्रकारे अभाविप शाखेची नवीन कार्यकारणीची घोषणा होत असते.यावेळी अक्कलकोट शहर अध्यक्ष म्हणून संगमेश्वर लिंगदाळे यांची तर तालुका प्रमुख म्हणून आकाश चव्हाण,
शहरमंत्री म्हणून आकाश कलशेट्टी,शहर उपाध्यक्ष- शरणय्या मुसती,तालुका सहप्रमूख - इरेश फताटे, शहरसहमंत्री - राहुल वाडे,रोहित कदम,कार्यालय मंत्री - प्रभाकर माळी, कार्यलय सहमंत्री - स्वप्निल स्वामी, शहर महाविद्यालय प्रमुख - गुरु कुंभार,शहर सहमहाविद्यालय प्रमुख - राहुल बगले,विद्यार्थिनी प्रमूख - कु.रोहिणी गाढवे, विद्यार्थिनी सहप्रमूख - कु.प्रज्ञा नालवार,आंदोलन प्रमुख - प्रसन्न गवंडी, आंदोलन सहप्रमुख - सागर न्हावी,कलामंच प्रमुख - मल्लिकार्जुन कुंभार,एस.एफ. डी.प्रमुख - गुरुप्रसाद कुंभार,यांची निवड अभाविपचे प्रदेशसहमंत्री शुभम अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागसंघटन मंत्री स्वप्नील बेगडे होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयूर स्वामी यांनी केले. तर आभार इरेश फताटे यांनी मानले.या कार्यक्रमास प्रा.डॉ.शंकर धडके,प्रदीप पाटील,रवी वाघमोडे,वैभव स्वामी,आदित्य जोशी,महेश स्वामी,समर्थ स्वामी,
यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post