हिंदु सेना तालुका अध्यक्षपदी चेतन खुबा यांची निवड


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील आलूर येथील चेतन खुबा पवार यांची हिंदू सेनेच्या उमरगा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
चेतन पवार यांना या निवडीचे नियुक्तीपत्र हिंदु सेना मराठवाडा अध्यक्ष रविशंकर मंडीवाळ यांनी दिले आहे.यावेळी हिंदु धर्माविषयी असलेली आत्मीयता आणि प्रेम तसेच सामाजिक कार्यातील झंझावात पाहून चेतन पवार यांना हे पद देण्यात आले आहे,असे मत हिंदु सेना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी  सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.सध्या चेतन पवार यांनी राष्ट्रीय बंजारा शिवसेना उमरगा-लोहारा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.या निवडीबध्दल परिसरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post