इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व माजी मंत्री
डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे अहिल्यादेवी
जयंती उत्सव समिती बेंबळी,सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,उस्मानाबाद,रोटरी हॉस्पिटल,उस्मानाबाद, कै.स्वातंत्रसेनानी भानूदासराव धूरगुडे सेवाभावी संस्था मंगरुळ व ग्रामपंचायत,बेंबळी यांच्या समयुक्त विद्यमाने दि.1 जुन रोजी मोफत कर्णतपासणी,
नेत्रतपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले.
या शिबीकरास ग्रामस्थानी चांगला प्रतिसाद दिला.
या शिबीरात 270 रुग्णांची कर्ण व नेत्र तपासणी करण्यात आली.या शिबिरातील 80 रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मिळणार आहेत.व तसेच 130 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.व 35 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. व रक्तदान शिबीरात 51जणांनी रक्तदान केले.या कार्यक्रमास जि.प.सदस्य महेंद्र काका धुरगुडे, सह्याद्रि हॉस्पीटलचे संचालक डॉ.दापके-देशमुख दिग्गज,बेंबळी चे सरपंच बाळासाहेब माने,नंदकुमार गावडे,माजी सरपंच बाळासाहेब कणसे,दादासाहेब कोरके,मजहर पठाण,डॉ.इलियास खान,डॉ.शिरगिरे, रोटरी क्लब उस्मानाबाद चे डॉ.ईसाके,डाॅ.होळकर मॅडम,राजाभाऊ सोनटक्के,ग्रा.पं.सदस्य राजाभाऊ रसाळ,महंमद कोतवाल,बिरु वाघुलकर,ग्रा.पं.सदस्य सलीम शेख,इम्रान पठाण,गुड्डू शेख.दत्ता सुडगे, मंगेश घोडके,धिरज वाघे,सचिन गाडे,अहिल्यादेवी,
यांच्यासह जयंती उत्सव समिती चे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
