नियमीत योगाभ्यासाने ताणतणाव विरहीत निरोगी जगणे शक्य: पोलीस अधिक्षक एम.राजकुमार


यवतमाळ(प्रतिनिधी) :  21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता दक्षता भवन येथे साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, एसडीपीओ पियुष जगताप, पोलीस निरिक्षक मुकूंद कुळकर्णी, शिरभाते, आरपीआय दुबे, शुक्ला, मिरासे, श्रीमती बावीस्कर, श्रीमती पंधरे, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


योग शिबीरापुर्वी मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिबीराला पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष संजय चाफले, अमोल झांबरे यांनी प्रशिक्षण दिले. ताडासन, वृक्षासन, अर्धचंद्रासन, शवासन, आदींसोबत कपालभारती, नाडीशोधन, भ्रामरी, शितली प्राणायम व ध्यान याबाबत मार्गदर्शन केले. योग ही भारताची परंपरा असून त्याला फॅशन म्हणून न स्विकारता रोज योग करावा असे प्रशिक्षक चाफले यांनी सांगीतले. उपस्थित अधिकारी व कर्मचारी बंधू यांनी यावेळी उत्साहाने योगासने केली. शिबीराचे संचालन व आभार प्रकाश देशमुख यांनी मानले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post