समाज विकास संस्था यांच्यावतीने कराटे ओपन नँशनल चँम्पीयनशिप मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व प्रशिक्षकाचा सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- कराटे ओपन नँशनल चँम्पयनशिप मध्ये घवघवीत यश संपादित केलेल्या विध्यार्थ्यांचा व त्यांच्या प्रशिक्षकाचा समाज विकास संस्था उमरगा यांच्यावतीने यथोचित सत्कार करुन त्यांना गौरविण्यात आले.
15 वी ओकीनाव्हा गुजुरोओ कराटे ओपन नँशनल चँम्पयनशिप दि.1 मे ते 8 मे 2018 मध्ये मलेशियात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये महेबुब बिस्मिल्ला मोमीन गोल्डमेडल रा.लोहारा (वय12) इयत्ता सातवी,
अजिंक्य बाळासाहेब बिराजदार गोल्डमेडल रा.किल्लारी(वय 12) इयत्ता सातवी,या यशस्वी विद्यार्थ्यांची इंडोनिशीयातील जकारता येथील जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांचा स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी दि.22 जुन ते दि.28 जुन या कालावधीत काश्मिर येथे प्रशिक्षण होणार आहे.या विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक महमद रफि शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.यावेळी या यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षकाचा मान्यवरांच्या हस्ते समाज विकास संस्थेच्यावतीने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.मोहेकर,डॉ.प्राचार्य गरुड,डॉ.प्रा.व्यंकट अणिगुठे,बालाजी इंगळे,परमेश्वर सुकाळे,मनिषा गुंजाळ,मानवलोकचे अनिकेत  लोहीया,समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद
 पांचाळ,संस्थेचे कार्यवाह भुमिपुत्र वाघ,विजया वाघ, अजित कांकरिया निखिल वाघ,अलका गुरव,आशा गुरव,ज्योती राजपुत शालिनी पाटील,विठ्ठल ओव्हाळ, विद्या मारकद,आनंद वाघमारे,संतोष मोरे,यांच्यासह नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post
18 June 2018 at 15:05

Candidates who will apply for cet 2019 should read the released notification very carefully to avoid any kind of mistakes at the time of filling of application form.

Reply
avatar