लोहारा शहरातील लोकवाचनालयात भाजपच्यावतीने लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुका भाजपच्यावतीने लोहारा शहरातील लोकवाचनालयात दि.3 जुन रोजी भाजपाचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या चतुर्थ स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन भाजप तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी व हाजी बाबा शेख व लाेकवाचनालयाचे सेक्रेटरी माणिक तिगाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,ज्येष्ठ नेते शंकर मुळे,विजय महानुर,तालुकी सरचिटणिस शिवशंकर हत्तरगे,किसान आघाडी मोर्चा तालुकाध्यक्ष सुनिल सुर्यवशी,तालुका उपाध्यक्ष सुभाष गिरी, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अश्पाक सुंबेकर,दगडु तिगाडे,परमेश्वर कदम,अाेबिसी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे,दयानंद शेवाळे,अाबा शिदे,संताेष कुभार,
यांच्यासह शहरातील व तालुकयातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post