- लाखो किमतीचे सरकारी मुद्देमाल कुणाच्या घस्यात
- येणेंगुर टोल नाक्यावरील लोखंडी साहित्याची परस्पर विल्हेवाट चोर कोण कोण?
चेतन पवार
उमरगा तालुका (प्रतिनिधी) उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील येणेंगुर ( ता.उमरगा) टोल नाक्यावरील मोठ्या कमानीचे लोखंडी अँगल आणि त्यावरील जवळपास 100 पत्रे निविदाविनाच लंपास करण्याचा घाट केला जात आहे .त्यामुळे जवळपास 10 लाखापेक्षा जास्त किमतचे असलेले सरकारी मुद्देमाल नेमके कुणा-कुणाच्या घस्यात जाणार आहे याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीची कार्यवाई करावेत अशी मागणी विविध संघटनेकडून करण्यात आली आहे
उमरगा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील येणेंगुर टोल नाक्यावरील मोठ्या कमानीचे लाखो किमतीचे लोखंडी अँगल बऱ्याच महिन्यापासून रस्त्याच्या कडेला पडून आहे तर त्यावरील जवळपास शंभर पत्रे लंपास करण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या बाजूला पडून राहिलेले सदरील साहित्य सरकारी मालकीचे असून त्याकडे कुणाचेच लक्ष नसल्यामुळे त्यातील कांही मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्षपणा करत आहेत विशेष म्हणजे याच विभागातील कांही मंडळींना हताशी धरून कांही महाभागांनी चार महिन्यांपूर्वी टोलनाक्यावरील जवळपास शंभर पत्रे आणि लोखंडी साहित्य पळवले आहेत.
त्यात गेल्या आठवड्यात रस्ता काम करणाऱ्या एसडीपीएल नावाच्या खासगी कंपनीतील एका महाशयाने नाक्यावर पडून राहिलेले कांही साहित्य ट्रक भरवून नेले आहे विशेष म्हणजे त्याच्याकडे संबधित विभागाचे कुठलेही आदेशपत्र नव्हते. सदरील मुद्देमाल हे सरकारी मालकीची असताना एखादा खासगी व्यक्ती वा एखादी कम्पनी निविदविना आणि ऑर्डर पत्र नसताना कसे काय घेवून जावू शकतो ? या विचाराने अनेकांनी त्यास हटकले तेंव्हा त्याने सोलापूरच्या कार्यालयाकडून तोंडी आदेश आहेत असे सांगून कांही मुद्देमाल पळवले याबाबत सम्बधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता सुरुवातीला कोणी माहिती द्यायला तयार नव्हते त्यानंतर त्याच विभागातील एका कर्मचाऱ्याने ऑर्डर असेल कार्यालयाला येवून भेटा असे सांगून आपल्यावरील जबाबदारी झिडकारली त्यामुळे याप्रकरणात नेमके गौडबंगाल काय असावा हा प्रश्न समोर येत आहे
दरम्यान नाक्यावर पडून राहिलेले लाखो किमतीचे साहित्य हे सरकारी मुद्देमाल असताना त्याची विल्हेवाट लावण्यासाठी रितसर निविदा काढणे तसेच एखाद्या वर्तमान पत्रात त्यासम्बधी जाहिरात देणे त्यानंतर नियमनुसार आदेशपत्र देवून मुद्देमलाची विल्हेवाट लावणे आणि मुद्देमलाची आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरणा करणे हे गरजेचे आहे मात्र अशी प्रक्रिया न करताच एखाद्या खासगी कंपनी अथवा खासगी व्यक्ती सरकारी मुद्देमाल कसे काय घेवून जावू शकतो ? याविषयीचर्चा सुरू आहे
- जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार पाठवले आहे
येणेंगुर टोल नाक्यावरील लाखो किमतीचे लोखंडी अँगल व पत्रे परस्पररित्या विल्हेवाट लावले जात आहे . सरकारी मुद्देमाल असल्यामुळे त्याची विल्हेवाट लावली जाताना निविदा काढणे तसेच ऑर्डर असणे गरजेचे आहे मात्र अशी प्रक्रिया केल्याचे दिसत नाही. तरीही लाखो किमतीचे साहित्य लंपास करण्यात येत आहे याबद्दल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे
संतोष कलशेट्टी येणेंगुरउपाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उस्मानाबाद
ऑर्डर नसताना चार महिन्यांपूर्वी कांही लोकांनी नाक्यावरील पत्रे व लोखंडी साहित्य नेले आहे त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांचे नाव सांगितले गेले.तसेच चार दिवसापूर्वी एस डी पी एल मधील एक रोजगारी ऑर्डर जवळ नसताना नाक्यावरील साहित्य नेले आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना संपर्क साधल्यावर ते समाधानकारक माहिती देईनात त्यामुळे प्रकारात नक्कीच गौडबंगाल आहे याची चौकशी व्हायला पाहिजे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे व मंत्रालयाकडे निवेदन देणार आहे
प्रशांत धुम्मा अध्यक्ष बसवेश्वर युवक मंडळ मुरूम

