- अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चुकीमुळे १७२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे धोक्यात.
अमरावती- युवक काँग्रेस व NSUI(विद्यार्थी काँग्रेस) च्या वतीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इलेक्ट्राॅनिक्स अॅन्ड टेलीकम्युनिकेशन(ENTC) शाखेच्या चौथ्या सत्राचे दोन पेपर विद्यार्थ्यांना माहीत नसताना पेपरच्या तारखेआधीच पेपर घेण्यात आला... नवीन नोटीफीकेशन १० महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले नसल्यामुळे या १० महाविद्यालयांतील तब्बल १७५ विद्यार्थी पेपर देण्यापासून वंचित करण्यात आले.
महाविद्यालयांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणुन प्र कुलगुरुंना निवेदन देण्यात आले... त्यांनी तब्बल एक तास या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करुन समस्या समजून घेतली व लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही याची ग्वाही दिली.... आठ दिवसांत या विषयावर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही युवक काँग्रेस व एन.एस.यु.आय च्या वतीने देण्यात आला.... .सदर निवेदन हे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु बोबडे व महासचिव निलेश गुहे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून तर महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस चे मा.सचिव निनाद मानकर यांच्या
मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आहे त्यावेळी त्यांच्या बरोबर NSUI चे जिल्हाध्यक्ष गौरव पवार,असंघटित कामगार काँग्रेस चे अध्यक्ष फिरोज शहा उर्फ भुऱ्या भाई, विद्यार्थी काँग्रेस चे उपाध्यक्ष अथर्व वंजारी, महासचिव संकेत साहु, प्रदेश प्रवक्ता ओजस मोरे, सचिव पारस चौधरी, सचीव शुभम पारोदे, माजी उपाध्यक्ष संकेत बोके, NSUI अकोला जिल्हा महासचिव अमेय महल्ले, आकाश गावंडे,आदींच्या संख्येने पदाधिकारी व विद्यार्थी गण उपस्थीत होते....


