इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा शहरातील आर्य समाजाच्या सभागृहात दि. 20 मे रोजी अनुगामी लोकराज्य महाभियान अंतर्गत उमरगा,लोहारा तालुक्यातील अनुलोम वस्तीमित्र कौटुंबिक मेळावा घेण्यात आला.
यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील वेगवेगळ्या भागात तथा गावात निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्या अनुलोम वस्तीमित्रांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन उमरगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.एन.जगताप,जयंत पाटील, विस्ताराधिकारी,अदि उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी बी.एन.जगताप यांनी वस्तीमित्रांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील जवळपास 50 वस्तीमत्रांनी आपला सहभाग नोंदवुन आपले अनुभव इतरांसमोर मांडून एकमेकांना प्रेरित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील शिंदे यांनी केले तर आभार अक्षय माढेकर यांनी मानले.यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
