आसवाना पापण्यांचा
मीच भिंती बांधल्या
भावना फेसाळलेल्या
नेमक्या मी कोंडल्या
मीच भिंती बांधल्या
भावना फेसाळलेल्या
नेमक्या मी कोंडल्या
काळजाच्या यातना ही
अंतरंगी गोंदल्या
तडकलेल्या चार भेगा
धीर धरुनी सांधल्या
अंतरंगी गोंदल्या
तडकलेल्या चार भेगा
धीर धरुनी सांधल्या
राग लोभाच्या निशाण्या
दूर आता सारल्या
वादळाच्या सर्व शिमा
घट्ट पदरी बांधल्या
दूर आता सारल्या
वादळाच्या सर्व शिमा
घट्ट पदरी बांधल्या
लाख चकवे सोसले अन्
खूप शिक्षा भोगल्या
वेगळाल्या पायवाटा
मी मनाने शोधल्या
खूप शिक्षा भोगल्या
वेगळाल्या पायवाटा
मी मनाने शोधल्या
आज माझ्या पावलानी
सर्व बेड्या तोडल्या
कैदखान्यातून सा-या
सावल्या मी मुक्त केल्या
सर्व बेड्या तोडल्या
कैदखान्यातून सा-या
सावल्या मी मुक्त केल्या
मांडली आरास नाही
भावना मी जाळल्या
यज्ञ यागातून माझ्या
फक्त समिधा वाहिल्या
भावना मी जाळल्या
यज्ञ यागातून माझ्या
फक्त समिधा वाहिल्या
तुकाराम पाटील
पिंपरी पुणे १७