​आनंदकंद​ ​करुणाघना​


माझ्या मुठीत माझा बघ वर्तमान आहे
याचे मला स्वतःला नक्कीच भान आहे
जन्मून धन्य झालो देशात मी मराठी
बाणा स्वतंत्रतेचा माझे  इमान  आहे
वाचून संत नचने रक्तात तीच भिनली
अबला जगातली मज माते समान आहे
हैदोस घलणारे शोधून झोडले मी
मी दावले तयाना त्यांचे  स्मशान आहे
जोडून हात भजतो ज्ञाना, तुका, जनीला
त्यांच्या मुळेच माझी ही ताठ मान आहे
शाहू , फुले नी बाबा ही दैवतेच माझी
त्यानी दिले जगाला आदर्श ज्ञान आहे
मी मावळा शिवाचा आहे मराठमोळा
प्राणा पल्याड जपला मी स्वाभिमान  आहे
अन्याय झेलणयाचा माझा  स्वभाव नाही
करुणाघना तुझे मज इतकेच दान आहे

तुकाराम पाटील
पिंपरी पणे १७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post