- रामकथा व ज्ञानेश्वरी पारायणाची कार्यक्रम उत्सहात साजरा
- सात दिवस विविध धार्मीक कार्यकमाचे आयोजन
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील अचलेर येथे अखंड हरिनाम सप्ताह व रामकथा तसेच ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या पारायनामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. या पारायणाची सुरुवात मिती वैशाख कृ.दि.११ मे या रोजी पहाटे ४ वाजता श्री रामायणाचार्य अमोल महाराज नकाते यांच्या हस्ते कलश पुजनाने करण्यात आले.यावेळी कलश व विना पूजन म्हणून सौ.उमादेवी अनंतसिंग बायस,भारताबाई बाबुराव गोपने,सुरेखा ज्ञानेश्वर पुजारी,भारताबाई गुंडू सुरवसे,शकुंतला गुंडेराव हरवले,यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठ चालक व ज्ञानेश्वरी वाचक म्हणून चंद्रकांत पुजारी,उमाशंकर मिटकरी महाराज यांनी काम पाहिले.
सलग सात दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दररोज काकडा भजन,विष्णूसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,हरिपाठ,हरिकिर्तन, हरिजागर,प्रवचन,भजन,रामकथा,किर्तन असे विविध उपकृम घेण्यात आले.हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोपने यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमामधे ह.भ.प अमोल महाराज नकाते चुंबळीकर,ह.भ.प बुध्दीवंत महाराजमअर्जुन महाराज, ह.भ.प.योगेश इंगळे महाराज,ह.भ.प. राम महाराज पुजारी,यांनी सहभाग घेवुन सविस्तर मार्गदर्शन केले. या सप्ताहाची सांगता दि १७ मे रोजी सकाळी ८ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथदिंडीची गावातून ज्ञानोबा माऊली तुकाराम अशी घोषणा करीत भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर ११ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज अनसुर्डीकर यांचे किर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. त्यानंतर शिवनेरी अदिशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था अचलेर व राजेंद्र गोपने यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
हा अखंड हरिनाम सप्ताह व रामकथा सोहळा यशस्वी करण्यासाठी अचलेर व परीसरातिल सर्व वारकरी मंडळ,भजनी मंडळ,तसेच समस्त अचलेर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
