जाहिरात
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा-लोहारा तालुका सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उमरगा तालुक्यातील कसगीचे सुपुत्र डॉ.गिरीष दिलीपराव बदोले हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम तर देशात 20 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्ल मुरुम शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात भव्य नागरी सत्कार सोहळा दि.26 मे रोजी सायंकाळी पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजीतसिंह पाटील होते.
यावेळी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते डॉ.गिरीष बदोले यांचे वडील दिलीप व आई सौ.शोभा यांच्या समवेत फेट्टा,शाल व भव्य पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला.या वेळी प्रमुख म्हणुन माजी आमदार सिद्रामाप्पा आलूरे गुरुजी,जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, मुंबईचे प्रधान सचिव अनिल डीग्गीकर, पुणेचे साखर सहसंचालक दत्तात्र्य गायकवाड,
जाहिरात
विठ्ठलसाईचे संचालक विठ्ठलराव बदोले,माणिक राठोड,माकणीचे शरणप्पा पत्रिके,उमरगा रोटरीचे डॉ.लक्ष्मीकांत डिग्गीकर,डॉ.उदय मोरे,सक्षणा सलगर,बाबा जाफरी, स्वागताध्यक्ष प्रशांत मुदकण्णा, सुनिल माने,संयोजन समितीतील माजी उपनगराध्यक्ष राजू मिणियार,माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकण्णा, नगरसेवक अजित चौधरीसह प्रमोद कुलकर्णी, शिवशरण वरनाळे,शरणाप्पा मुदकण्णा,अदि उपस्थित होते. या वेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील बोलताना म्हणाले की,आपल्या जिल्हयातील सामान्य शेतकरी कुटूंबातील गिरीष बदोले यांनी देशाच्या नकाशावरती जिल्हयाची शान आणि मान राखत जिल्हयाची उंची वाढविण्याचे काम केल्याबद्ल आम्हा सर्वांना आपला सार्थ अभिमान वाटतो.आपण मिळविलेले यश जिल्हयातील तरुणांना कायम प्रेरणा देणारे ठरेल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.व तसेच यावेळी माजी आमदार आलूरे गुरुजी म्हणाले की,डॉ.बदोले यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन जे यश संपादन केले आहे ते कौतुकास्पद असून त्यांची जिद्द,मेहनत,कष्ट करण्याची तयारी,सातत्य या गोष्टी तरुणांनी त्यांच्याकडून घेतल्या पाहिजेत.असे सांगीतले. यावेळी डॉ.बदोले यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,ग्रामीण-शहरी असा भेदभाव न करता नियमित अभ्यास करणे,शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे,वडीलधारी मंडळींचे संस्कार घेणे व सर्वांचा आदर करणे महत्वाचे आहे.माझ्या जीवनामध्ये कितीतरी संकटे आली पण निराश न होता सतत ध्येयाच्या मागे धावत होतो.नकारात्मक गोष्टींना मी माझ्या जीवनात कधीच धारा दिला नाही.सकारात्मक गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास होता.मी माझा आत्मविश्वास व एकाग्रता कधीही ढळू दिली नाही. स्वप्न पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचे नाही या हेतूनेच मी अभ्यास करत राहिलो या मुळेच यश मिळविता आले.आपणही असे यश संपादन करु शकता त्यासाठी नियमितपणे अभ्यास,प्रयत्नाची पराकाष्टा, जाणीवा,सयम व शिस्त बाळगणे या गोष्टी आपल्या अंगी बाळगल्या पाहिजेत.आपण जो माझा नागरी सत्कार केलात त्यांच्या ऋणात राहून भविष्यात मला जे चांगल्यात चांगले करता येईल ते माझ्या हातून करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे त्यांनी शेवटी सांगीतले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मिणियार,सी.टी. क्लबचे डॉ.विजयानंद बिराजदार,डॉ.नितीन डागा, बसवेश्वर मंडळाचे अध्यक्ष प्रशांत धुम्मा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे,युवासेना अध्यक्ष भगत माळी, किसान गणेश मंडळाचे अध्यक्ष भिमराव फुगटे,टिपू सुलतान ग्रुपचे अध्यक्ष बाबा कुरेशी,संभाजीराजे ग्रुपचे अध्यक्ष सचिन शिंदे,शिवसेना शहरप्रमुख विनोद पोतदार,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड,माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे, सिद्धरामेश्वर युवा मंच अध्यक्ष नागेश मुदकण्णा,बसव अनुभव मंटपचे देवराज संगुळगे,जगदीश निंबरगे,शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शफी इमडे,महेश निंबरगे, राजेंद्र कारभारी,आंनद कांबळे आदींनी,परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्या डॉ.अनिता मुदकण्णा व सूत्रसंचालन ममता बोल्ली व प्रविण स्वामी यांनी केले तर आभार किरण गायकवाड यांनी मानले.या कार्यक्रमास शहरातील व परिसरातील विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.