भानामती चमत्कार करुन दाखवा दोन लाख मिळवा —प्रा.उळेकर

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भानामती चमत्कार करुन दाखवा दोन लाख लाख रुपये मिळवा असे प्रतिपादन अंध श्रध्दा तुळजापुरचे कार्यकर्ते प्रा.चंद्रकांत उळेकर यांनी केले.
लोहारा तालुक्यातील  उंडरगावात येथे अंधश्रधा निर्मुलन समितीचे गटन दि.26 मे रोजी करण्यात आले.या प्रसंगी  येथील त्रिबेकेश्वर कुंभमेळा मठात अंध श्रध्दा जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनगिरी महाराज उपस्थित होते.या वेळी अंध अंधध्दा  निर्मूलन तुळजापुर तालुका कार्यकर्ते प्रा.चंद्रकांत उळेकर बोलत होते.
जाहिरात
यावेळी चंद्रकांत उळेकर पुढे वोलताना म्हणाले कि,ग्रामीणभागापासुन ते शहरापर्यत  भुत भानामतीच्या नावाखाली अनेकांना फसवले जाते . तसा प्रकार असेल तर अंधश्रधा निर्मून संघटनेकडुन भानामती भुत चमत्कार सिध्द करुन  दाखवा आणि दोन लाखांचे बक्षिस मिळवाअसे आवाहन ग्रामस्याना यावेळी केले. होते.तसेच जनतेत अंधश्रदेच्या माध्यमातुन भानामती,चिटकी,जादुटोना,पुजाविधी,
भुत,आदी विषयावर मोलाचे सविस्तर मार्गदर्शन करुन त्यांनी अनेक प्रयोग करुन यावेळी दाखविले.व शेवटी सिध्द करुन दाखविले.व आपण लवकरच महाराष्ट्रभर अंधश्रधा निर्मुलन जनजाग्रती करुन गाव तेथे शाखा काडुन अंधश्रधा संपुष्ठात आणण्याकरीता जनतेच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असुन भानामती ज्यांना करायची असेल त्यांनी आमच्यावर जरुर करुन दाखवावी आम्ही पाहु कसली भानामती आहे.असे त्यांनी सांगीतले.
जाहिरात
तसेच यावेळी बबनगिरी महाराज मार्गदर्शन करताना म्हणाले कि,अंधश्रदेच्या माध्यमातुन नरबळी बरोबर,बोकडे,कोबडयांची हात्या मोठयाप्रमाणात केली जाते.देवदेवतीच्या नावाखाली आंगात येणे जोतीशी,पाणाडया,बुवाबाजी,असे अनेक घाणेरडी प्रथा पाहावयास मिळते.ती अधुनीक तंत्रज्ञानुसार सर्व खोटी असुन जनतेने आशावर विश्वास ठेवु नेये.आपण लवकरच गाव तेथे अंधश्रदा निर्मुलन बाबत जनजाग्रती करुन अंधश्रदेच्या विरोधात आवाज उठवणार आहे.शेतातील पिकांना लागली पनवती, गोठयातल्या जीवावर उठली भानामती .... असे अनेक विचार त्यांनी अधश्रदेविषयी माडले.
या कार्यक्रमास सोमनाथ तोडकरी,निवृत शिक्षक अकुश सगट,शिक्षक नाना सुर्यवंशी,मुरलीधर मोरे, उपसरपंच.दादा गंगणे,बाबा पाटील,दिनेश तोडकरी, यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post