इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शासनाने प्रोत्साहनपर योजनेत दिलेली मदत तात्काळ वाटप करण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन लोहारा शहरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र शासनाने रेग्युलर कर्ज भरना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लोहारा तालुक्यात प्रोत्साहनपर योजनेची मदत म्हणुन तालुक्यातील 2235 शेतकऱ्यांना 3 कोटी 68 लाख रुपयेची मदत एफ्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली पण फक्त 600 शेतकऱ्यांना वाटप 1 कोटी रुपयाचे वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेने केले.
पण बाकीची 2 कोटी 68 लाख रुपये रोकड नसल्याचे सांगत 1 महिन्यापासुन झालेले नाही.आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे पैसे जिल्हा बँकेने तात्काळ वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश देवुन तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत व सहकार्य करावे,असे निवेदवात म्हटले आहे.या निवेदनावर शेतकरी आयनोदीन सवार,बस्वराज भगवान पाटील,सुकाजी माणिक सातपुते,अदिंच्या सह्या आहेत.