- सिटी तायक्वोंडो क्लबच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
मुर्तिजापूर (प्रतिनीधी) :- प्रगतीकडे वाटचाल करीत असतांना मुलींनी देखील सर्व क्षेत्रात भरारी घेवून आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. समाजातील काही वाईट प्रवुतींचा सामना सर्वांनाच करावा लागतो. त्यामुळे मुलींनी देखील आत्म संरक्षणात मागे राहू नये.
त्यांच्यामधे आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून सिटी तायक्वोंडो क्लब द्वारा उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात मुलींना देखील आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी केले. ते सिटी तायक्वोंडो क्लब द्वारा आयोजीत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी ज्ञानेष्वर टाले, विलास नसले, रवि चव्हाण, विलास वानखडे, दिनेश श्रीवास, नितिन माडगूळकर
यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. त्यानंतर खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवीले. सिटी तायक्वोंडो क्लबचे
प्रशिक्षक दिनेश श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली या उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात तायक्वोंडो, नुत्य, स्केटींग आणि मैदानी खेळ सोबतच आत्मसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबिरात सहभागी सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेष्वर टाले व विलास नसले यांनी विचार व्यक्त केले. प्रशिक्षण शिबीराच्या यशस्वीते करीता प्रतिक येदवर, रत्नजीत सबूर, प्रिया चव्हाण, पल्लवी खाडे, भारती आमटे, प्रणव मुळे, सचिन खडसे, यादव, दिपक अहेरवार, सय्यद जमिल, आदिंनी परीश्रम घेतले. प्रशिक्षणा दरम्यान प्राचार्य तिवारी सर, ज्ञानेश्वर भड,रोहित सोळंके यांंचे सहकार्य लााभले .
