इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरूम येथील किशोर शंकर पवार यांची दि.11 मे रोजी भारतीय बंजारा क्रांती दल युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून निवड झाली आहे.
भारतीय बंजारा क्रांती दल चे राष्ट्रीय महासचिव तथा भारतीय जनता पार्टी ओ.बि.सि.मोर्चा महाराष्ट्र राज्य चे प्रदेश उपाध्यक्ष शरद काशिनाथ राठोड यांनी नियुक्ती पत्र देऊन सदर पदावर निवड केली आहे.त्यामुळे मुरूम परिसर तथा तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
किशोर पवार यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या मित्रपरिवार व बंजारा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यातर्फे शॉल श्रीफळ व फेटा बांधून त्यांच्या पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
