इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुळजापुर येथील महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.सन 2016 — 17 च्या सर्वे करून मंजूर झालेले DP बसण्याच्या संदर्भात काटी येथील गाटेवाडी शिवारातील मंजूर DP बसण्याबाबत महावितरणचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार अधिकार्यांला भेटून देखील तरी DP चा प्रश्न मार्गी लागत नाही.संबंधित अधिकारी उडवा - उडवीची उत्तरे देत आहेत.व जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार सौदागर व प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमरसिंह गाटे यांनी दि.31/05/2018 रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन कार्यकारी अभियंता तुळजापूर यांना दिले आहे.यावेळी निवेदन देताना शशिकांत मुळे,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अजित
हुंडेकरी,युवक तालुका सचिव प्रहार जनशक्ती पक्ष
राघवेंद्र चाबुकस्वार,युवक तालुका अध्यक्ष अमोल
गावडे,युवक तालुका उपाध्यक्ष राम देशमुख,युवक
तालुका -संघटक किशोर बनसोडे- प्रहार विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे,प्रहार जनशक्ती पक्ष तालुका कार्याध्यक्ष केशव आगलावे,उमेश गावडे,
समाधान गावडे,यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
