शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.किल्लारी चालू करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे — सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथील सहकारी साखर कारखाना चालु करण्यासठी राज्य शासन कटीबध्द आहे,असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष बापु देशमुख यांनी केले.
येणाऱ्या वर्षात अधिकचा होणार ऊस लक्षात घेवुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या सुचनेनुसार    शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत किल्लारी साखर कारखाना चालु करण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर(लातुर) व मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार व अवसायक मंडळाच्या यांच्या विनंती वरुन सहकार मंत्री सुभाष बापु यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.यावेळी सहकार मंत्री सुभाष बापु देशमुख बोलत होते. शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी ता.औसा जि.लातुर हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी पासकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर (लातुर) व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार,यांच्या विनंती वरून सहकार मंत्री सुभाष बापु देशमुख यांनी मंत्रालयात बैठक घेतली.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सहकार मंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करून हा कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहून कारखाना चालू करू असे आश्वासन यावेळी दिले.
या बैठकीस सहकार विभागीय अप्पर आयुक्त एस. एस.संधू,सहकार आयुक्त संभाजी कडू,साखर आयुक्त तोष्णीवाल,अवसायक मंडळ सदस्य संताजी चालुक्य पाटील,किरण उटगे,रमेश माने.डीडीआर जाधव,अदि उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post