इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर यांची पंढरपुरच्या देवस्थान कमिटीच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.आ.सुजितसिंह ठाकुर यांचा उमरगा तालुका भाजपाच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला,यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य,भाजपा उमरगा तालुकाध्यक्ष माधव पवार,भाजपा तालुका सरचिटणीस तथा जि.प.सदस्य दिग्विजय शिंदे , भाजपा नेते प्रा.विवेक टाचले सर,बाजार समिती उपसभापती रमेश माने,दिलीपसिंह गौतम,लोहारा पंचायत समिती सदस्य वामन डावरे,तालुका सरचिटणीस सिध्देश्वर माने,साई टाचले, प्रसन्न पुदाले,यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
