शरण पाटील यांनी महाश्रमदान केले.


इकबाल मुल्ला
लोहारा :-  तालुक्यातील उदतपूर येथे पाणी फाऊंडेशन च्या कार्यक्रमात उस्मानाबाद जि.प.विरोधी पक्ष नेते शरणजी पाटील यांनी दि.1 मे रोजी महाश्रमदान मध्ये सहभाग घेतला.यावेळी तालुक्यातील प्रथम येणा-या गावास
पहिले बक्षीस 10 लाख रुपये व दुसरे बक्षिस 5 लाख रुपये व तिसरे बक्षीस 3 लाख रुपये शरण पाटील यांनी जाहिर केले.
हे बक्षीस जाहीर केल्याबद्दल पाणी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमिर खान व अलिया भट्ट यांनी
जि.प.चे विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांचे विशेष कौतुक केले.यावेळी युवा नेते शरण पाटील यांच्यानंतर सिनेअभिनेञी अलिया भट्ट यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर अभिनेते अमिर खान व लातूर चे मुख्यकार्यकारी यांनी आपले मत मांडले.उदतपूर गावातील शाळकरी मुलींचा गावातील महिला ज्येष्ठ मंडळीसह ग्रामस्थांनी 22 दिवस महाश्रमदान करणार  ग्वाही यावेळी दिली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post