नागराळ(लो) येथे विजेचा शॉक लागुन तरुण युवकाचा मृत्यु


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- वीजेचा शॉक लागल्याने एका तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान लोहारा तालुक्यातील नागराळ (लो) येथे घडली आहे.
      नागराळ (लो) रवि गोरे (वय ३५) यांच्या घरात कलर देण्याचे काम सुरु होते.यावेळी कलरचे कसा देत आहेत.हे बघण्यासाठी रवि गोरे लोखंडी टूलवर उभे राहुन बघत असताना टूल खाली वीजे वायर होते. टूलचा भार वायवर पडल्याने वायर कट झाले व वीजे शॉक लागला.यावेळी त्यांना तात्काळ लोहारा ग्रामिण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तात्काळ उस्मानाबादला नेहण्याचा सल्ला दिला असता उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात घेवुन गेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.त्याच्या पार्थिवावर नागराळ( लो)येथे दुपारी चारच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन भाऊ,एक बहीन,दोन लहान मुले असा परीवार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post