इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै.माघनराव (काका)पाटील यांची १६ वी पुण्यतिथी मुरुम शहरात दि.20 मे रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी प्रारंभी कै.माधवराव पाटील यांच्या समाधी स्थळी व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै.माधवराव पाटील यांच्या पुर्णावृती पुतळ्यास माजी राज्यमंत्री तथा औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी प्रमुख म्हणुन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील,जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, पंचायत समिती सदस्य अॅड.राजासाहेब पाटील, नानासाहेब पाटील,उमरगा पंचायत समितीचे सभापती मदन पाटील,माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे,आष्टा कासारचे स्वामी विश्वशंकर गुरुजी,अँड.व्ही.एस. आळंगे,आप्पासाहेब हाळळे,काकासाहेब पाटील, प्रमोद कुलकर्णी,मेजर राजेंद्र बेंडकाळे,अँड.
राजासाहेब पाटील,शरद पाटील,विठ्ठलसाई कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर,मदन पाटील,जिल्हा परिषद माजी सदस्य दिलीप भालेराव,नगराध्यक्षा अनिता अंबर(मुरुम), उपनगराध्यक्ष संतोष चिलोबा,लातूरचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड,प्राचार्य डॉ.दिलीप गरुड,प्राचार्य डॉ.अशोक सपाटे,प्राचार्य काशीनाथ मिरगाळे, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी.अथनी,माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर,व्यंकट जाधव,जे.टी.लिमये, बबन बनसोडे,विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,संगमेश्वर घाळे,माणिकराव राठोड आदीं उपस्थित होते.व तसेच मुरुम शहरातील कै.माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय,प्रतिभा निकेतन विद्यालय,मुरुम,कोथळी,भुसणी व नूतन विद्यालय,मुरुम आदी ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
