मुरूम येथे जय संघर्ष ग्रुप वाहन चालक शाखेची स्थापना..

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राज्यातील वाहन चालक यांची अडी-अडचणी सोडवणारी जय संघर्ष वाहन चालक सामाजीक संस्थेची उमरगा तालुक्यातील मुरूम येथे स्थापना करण्यात आली.
मुरूम येथील जिल्हा परिषद मुलीची शाळा सभागृहात वाहन चालक सामाजिक संस्थेची बैठक घेण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुुन संस्थेचे औरंगाबाद नियोजन प्रमुख रवींद्र शेळके,प्रसिध्दी प्रमुख रमेश कोलते,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष कैलाश सरकाळे,अदि  उपस्थित होते.यावेळी मुरूम शहर जय संघर्ष ग्रुप च्या अध्यक्ष पदी सुधीर गायकवाड,उपाध्यक्ष पदी सतीश शेळके,सचिव पदी दत्ता अंबाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या कार्यक्रमा साठी पंडित धुम्मा, प्रदीप शेळके,अर्जुन कांबळे,दत्ता कांबळे ,ताजुद्दिन शेख ,विजयकुमार झुरळे सह मुरूम येथील वाहन मालक व चालक उपस्थित होते.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post