जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या मुलाचे प्रशंसनीय यश

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि सौ.रेखा मनोज सानप यांचा मुलगा धनुष मनोज सानप याने प्रशंसनीय यश मिळविले आहे.नुकताच दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला.या परिक्षेत त्याने 92.8% गुण मिळविले आहेत.धनुष पनवेल येथील केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी आहे.

त्याचबरोबर धनुषची औरंगाबाद येथील शासनाच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेतही स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून निवड झाली आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 13 हजार विद्यार्थी या परिक्षेसाठी प्रवेशित झाले होते,त्यातून अंतिम निवड फक्त 60 विद्यार्थ्यांची करण्यात आली.या संस्थेत 11 वी व 12 वी च्या नियमित अभ्यासक्रमाबरोबरच नॅशनल डिफेन्स ॲकडमीच्या प्रवेश परिक्षेचीही तयारी करून घेतली जाते.या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post