​महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाच्या लोहारा तालुका अध्यक्षपदी मुकुंद शेटे यांची निवड


जाहिरात
​ इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाच्या लोहारा तालुका अध्यक्षपदी मकुंद शेटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या नाभिक कर्मचारी महामंडळाची बैठक उस्मानाबाद शहरात बैठक संपन्न झाली. यावेळी संघटनेचे प्रांत अध्यक्ष उत्तमराव सोलाने, मराठवाडा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत माने,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण माने व कर्मचारी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय भालेकर यांच्या हस्ते मुकुंद शेटे यांना लोहारा तालुका अध्यक्षपदी  निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नाभिक समाजाने संघटन मजबूत करून कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व समाजोन्नती करण्यासाठी संघटनेच्या ध्येयधोरणानुसार कार्यरत राहावे असे प्रांत अध्यक्ष उत्तमराव सोलाने यांनी सांगितले.
जाहिरात
यावेळी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लक्ष्मण घोडके,जिल्हा उपाध्यक्ष नितीन मंडाळे,विष्णू दळवी, उद्धव क्षिरसागर,संघटक वैशाली चौधरी,यांच्यासह नाभिक कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीचे विकास घोडके,सुर्यकांत पांढरे,सुदर्शन जावळे,युसुफ पटेल,रसुल शेख,सतिश जगताप, चंद्रकांत कदम,अमोल गेडेवाड,चंदनशिवे दाजी,राहुल आेवांडकर व नाभिक कर्मचारी व बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post