पूर्णा-प्रतिनिधी- महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला "अच्छे दिन"चे आमिष दाखवून सत्ता हस्तगत करणाऱ्या तसेच गोरगरीब सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करून,पेट्रोल,डिझेल तसेच सर्वच इंधनांच्या अफाट किमती वाढवून जनतेला महागाईच्या खाईत लोटनाऱ्या भाजप आणि मोदी सरकार कुंभकर्ण आवस्थे मध्ये गाढ झोपले आहे या सरकार ला जागे करण्या करिता आःदोलन करण्यात आले
मनसे परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली* पेट्रोल डिजल दरवाढी निषेधार्थ पूर्णा नांदेड रोड वरील पेट्रोल पंपावर पेट्रोलियम मशिनरी ची हार अर्पण करून पूजा केली व प्रत्येक वाहनांच्या टाकीत दोन दोन थेंब प्रट्रोल टाकत भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत बोबमरून जाहीर निषेध व्यक्त केला
यावेळी मनसे परभणी जिल्हाध्यक्ष श्री रुपेश सोनटक्के ,अनिल बुचाले ( जिल्हाध्यकक्ष), गोविंद (राज) ठाकर, (शहराध्यक्ष ) निशांत कमळू ( जिल्हासचिव ) ,पंकज राठोड , विष्णु चापके ,गजानन चापके, प्रकाश तुवर ,बापूराव माखनिकर, किशोर देसाई, कल्याण शेळके ,पावन बोबडे, यांच्या सह पूर्णा तालुक्यातील पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
