नाफेड ने हरभरा तुरीचे पेरणी पैसे अगोदर दिले नाही तर शिवसेना सभापती तथा गटनेता मनिष कराळे यांचा नाफेड च्या अधिकाऱ्यांना रुमने आंदोलन छेडण्याचा इशारा...

जाहिरात

आकोट :- हरबरा तुरीचे पैसे नाफेड ने पेरणी आगोदर दया.अन्यथा शिवसेनेचे रुमने घेवुन आंदोलन छेडु शिवसेना गटनेता तथा सभापती मनिष कराळे यांचा नाफेड अधिकार्‍यांना इशारा दिला.

आकोट तालुक्यातील शेतकर्‍यांच्या तुरीचे एप्रील महीन्यापासुन जवळपास पाच कोटी रुपयाचे देणी बाकी आहेत आणी हरबर्‍यांचे तर खरेदी सुरु झाल्यापासुन एकही रुपया शेतकर्‍यांना दिला नाही.आतापर्यंत हरबरा खरेदीचे शेतकर्‍यांची देणी ३ कोटी ४५ लाख ५२ हजार २००रु. बाकी आहे.यासाठी खरेदी विक्री आकोट यांनी सर्व आँनलाईन माहीती वरिष्ठांना कळविली पण यावर अजुनपर्यंत कोणती उत्तर आले नाही.
जाहिरात

हरबरा खरेदीची पण ऑनलाईन माहिती आजच वरीष्ठांना दिली असल्याचे खरेदी विक्री सघांचे सचिव हिंगणकर साहेबांनी दिली त्यावेळी त्यांनी सांगितले की मी आपली सर्व शेतकर्‍यांच्या देणीबाबत माहिती वरीष्ठांना देतो यावेळी संचालक सुनिल गावंडे कॉटन मार्केट चे विनोद कराळे, पंकज शाम जवंजाळ उपस्थित होते.

यावेळी आद.सभापतींशी संपर्क साधला असता ते बाहेरगावी होते पण मी तुमच्या या मागणी शी सहमत असे कळविले. यावेळी शिवसेना गटनेते तथा सभापती मनिष रामाभाऊ कराळे यांनी आपण आता निवेदण देणार नसुन रुमने आंदोलन छेडु असा इशारा दिला यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना पदाधीकारी युवासैनिक शिवसैनिक उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post