![]() |
| आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे |
मूर्तिजापूर :- ( प्रतिनिधी ) तालुक्यातील उनखेड ते वाई संग्राह प्रकल्पस्थळी बेमुदत साखळी उपोषणाच्या ७व्या दिवशी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करून आपला आक्रोश व्यक्त केला.पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देण्याची अपेक्षा यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केली आंदोलनाचे नियोजन प्रकल्पग्रस्तांनी पालक मंत्री रणजीत पाटील यांना दिले असून पालकमंत्री महोदयांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही. भूसंपादन पुनर्वसन पुनर्स्थापना व पारदर्शकता अधिनियम २०१३ (कायदा क्रमांक ३०) पाच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे.प्रकल्पांतर्गत २०११ ते २०१२ मध्ये झालेल्या सरळसेवा पद्धतीने जीचिन्हे जमिनीची खरेदी करण्यात आली त्याचा योग्य मोबदला मिळावा, उर्वरित जमीनीसाठी कायमस्वरूपी शेत रस्ते करून द्यावेत, संरक्षण भिंतीचे पक्के बांधकाम करून देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या उर्वरित जमीनची शासकीय मोजणी करून देण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी ७\०५\२०१८ पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेआहे. या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाने, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने, राजू वानखडे यांच्या प्रगती शेतकरी मंडळाने, शेतकरी जागर मंचाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तसेच प्रकल्पाचे कंत्राटदार अनुपसिंग यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन काम सुरू करू देण्याची विनंती केली. या आंदोलनात रंभापुर गट ग्रामपंचायत चे सरपंच प्रशांत इंगळे, सामाजिक कार्यकर्ते श्याम टिपरे , जीवन घोरमोडे, पोलीस पाटील राजू टिपरे, भैय्यासाहेब काकोडे, साहेबराव इंगळे , नितीन बंगाले, सुरेश वानखडे, गुलाबराव इंगळे ,वैभव टिपरे,उमेश काकोडे ,धम्मपाल वानखडे, वासुदेवराव इंगळे, बाबुलालजी किर्दक, कैलास तायडे, अविनाश वानखडे ,संतोष इंगळे , जगदंब इंगळे, पप्पु वानखडे, हर्षल इंगळे,सोपान घोरमोडे, अनिकेत तायडे ,पवन खेडकर ,अमोल इंगळे इत्यादि उपस्थीत होते...
