दि पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत लाखांदूर येथे बैठक संपन्न


​लाखांदूर - लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभागृहात दि पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत बैठक आज दि. 21 मे 2018 ला ठीक सकाळी 10 वाजता कार्यकारीणी, सभाषद नोंदणी संदर्भात मा. आशुभाऊ इंगळे, महा. राज्य संपर्क प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी नागपूर विभागीय अध्यक्ष प्राचार्य विश्वापाल हजारे - सकाळ, जिल्हा अध्यक्ष भंडारा विलास मेश्राम - देशोन्नती, प्रमोद प्रधान - लोकमत, पवन समरत - पुण्यनगरी , स्वप्नील ठेंगडी - पुण्यनगरी, नास्तिक लांडगे - दै. भास्कर, मंगेश राऊत - देशोन्नती, अभिमन ठाकरे - लोकशाहि वार्ता, मोहन चूने- भंडारा पत्रिका हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या बळकटी संदर्भात आशुभाऊ इंगळे यांनी योग्य मार्गदर्शन केले. पत्रकारांची भूमिका व त्यांची समाजातील महत्वाची जबाबदारी, लेखणीतून सर्वसामान्यांना न्याय कसा मिळवून देता येईल यासंदर्भात पत्रकारांची महत्वाची भूमिका कशी राहायला पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन केले. संचालन स्वप्नील ठेंगडी यांनी तर आभार नास्तिक लांडगे यांनी केले.​
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post