कळंब येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी हमीदखां पठाण

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- कळंब शहरातील तरुणांनी एकत्र येऊन प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीची स्थापन केली आहे.या समितीने या वर्षापासुन सावरकरांची जयंती साजरी करण्याचे निश्चीत केले आहे.या जयंती निमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जाहिरात

यावर्षी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुस्लीम व्यावसायीक हमीदखां युनुसखां पठाण यांची निवड सर्वानुमते निवड  करण्यात आली आहे.व तसेच सावरकर स्मारक समितीच्या अध्यक्षपपदी अँड.मनोज चोंदे यांची निवड करण्यात आली आहे.
जाहिरात

या समितीच्या वतीने नगर पारिषद प्रशासनाला स्वखर्चाने पुतळा चबुतरा रंगरंगोटी व साफसफाईसाठी निवेदन देवुन परवानगी मागीतली आहे.या निवेदनावर माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ, स्मारक समिती संयोजक मकरंद पाटील,शिवाजीराव गिड्डे,हमीदखां पठाण,प्रकाश शिंपले,यश सुराणा, सतीश शिंदे,नयुम शेख,अक्रमखां पठाण,किशोर भानुशाली,अँड.मनोज चोंदे,मकरंद माळेगावकर, रूषीकेश मुळीक,दत्तात्रय तनपुरे,बलदोटा, बाळासाहेब कथले,धनंजय कोळपे,अदिंच्या या निवेदनावर सह्या आहेत.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post