जेवळी येथील गुरु सिध्देश्ववर विरक्त मठाचे मठादिपती मनिप्र गंगाधर महास्वामी यांनी अधिक मास निमित्ताने तेलंगणा राज्यातील श्रीशैल मलिकार्जुन येथे एक दिवसाचे सातवे मौन व्रत अनुष्ठानास सुरुवात केली आहे.

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी ,:- लोहारा तालुक्यातील जेवळी येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठादिपती मनिप्र गंगाधर महास्वामी यांचे अधिक मास निमित्ताने तेलंगणा राज्यातील श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे एकवीस दिवसाच्या सातव्या मौन व्रत अनुष्ठानास प्रारंभ झाला आहे.
      भारतात असलेल्या बारा ज्योतिर्लिग पैकी एक स्थान तेलंगणा राज्यातील श्रीक्षेत्र श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे आहे. अधिकमास निमित्त जेवळी येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठादिपती मनिप्र गंगाधर महास्वामी यांच्या एकवीस दिवसाच्या सातव्या मौनव्रत तपोअनुष्ठानास मंगळवार ता 22 रोजी प्रारंभ झाला आहे.या मौनव्रत अनुष्ठान निमित्त दररोज ञिकाल इष्टलिंग महापूजा, विधिवत महापूजाअर्चा धार्मिक पद्धतीने सुरू आहेत. अखंड मानव जाती व विश्वकल्याण हेतू तसेच धर्माचे रक्षण व्हावे यासाठी हे मौनव्रत अनुष्ठान सुरू आहे.
जाहिरात
     या अनुष्ठानानाची सांगता सोहळा सोमवार ता 11 जून रोजी सकाळी दहा वाजता धर्मसभेने होणार आहे. या धर्मसभेसाठी मनिप्र राजशेखर महास्वामी नंदगाव, अवधूत गिरी महाराज श्रीशैल्य, षब्र श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर, षब्र सिद्धेश्वर शिवाचार्य लोहारा, षब्र शिवयोगी शिवाचार्य अणदूर, षब्र  धनलिंग रूद्रमणी शिवाचार्य राजेश्वर, षब्र दिगंबर शिवाचार्य वसमत, षब्र शिवमूर्ती शिवाचार्य अचलेर, षब्र महादेव शिवाचार्य वाई, षब्र गंगाधर शिवाचार्य बार्शी, षब्र पंडीताराद्या शिवाचार्य हळ्ळी खेड, षब्र चन्नमल देवरू हुडगी या मठाचे मठाधिपती उपस्थित राहणार आहेत. या मौनव्रत अनुष्ठान कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनुष्ठान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post