इकबाल मुल्ला
लोहारा :- महाराष्ट्र परिट(धोबी) सेवा मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा युवा उपाध्यक्षपदी लोहारा शहरातील अंकुश परिट यांची तर लोहारा तालुका अध्यक्षपदी बालाजी शिंदे व तालुका उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे जिल्हा अघ्यक्ष नेताजी रामराव घोंगडे यांनी यांना निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे.यावेळी धनंजय नाना शिंगाडे व राजाभाऊ शिंदे यांच्या हस्ते या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.या निवडीबध्दल परिसरातुन यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
