लोहारा तालुक्यात निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार छायाचीत्र मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे — तहसीलदार श्रीमती शोभा पुजारी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अधारीत छायाचीत्र मतदार यादयाचे पुनरिक्षण कार्यक्रम राबवीण्यात येणार आहे. त्यानुसार विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची तयारी 11 मे पुर्वीच झाली असुन बीएलओ मतदारांच्या जाऊन घरोघर भेटी मोहीम 15 मे ते  20 जुन  या कालावधीत होणार आहे अशी माहिती सहाययक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार श्रीमती. शोभा पुजारी यांनी सांगीतले.
 त्यामध्ये नविन मतदार वाढीविण्याबरोबर अचुक मतदार यादी तयार करण्याचा उदेश आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो घेण्यात येणार आहेत. त्यासह कृष्णधवल फोटो असलेले मतदारांचे रंगीत फोटो घेण्यात येतील. महिला मतदारांची नोंदणी  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे 15 मे 20 जुन या  कालावधीत मतदाराच्या घरोघरी भेटी देवुन बीएलओ रजिस्टर अदयावत व सखोलपणे पुर्ण करण्याचे काम पाहतील या भेटीत जिल्हयातील सर्व पात्र नागरीकांची मतदार नोंदणी, मृत दुबार स्थलांतरीत यांच्या चुका दुरुस्त करणे, नोंदवहीत याची नोंद घेणे असे कामकाज देण्यात आले आहे.
बीएलओ यांना प्रशिक्षण देण्यात आले असुन, या कामामध्ये कुचराई करणा-या आदेशाचे पालन करणार नाहीत अशा  बीएलओ यांचेवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post