![]() |
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शासनातील रिक्त पदावर संवर्गनिहाय व ज्येषठतेनुसार लमायोजन करावे व समायोजन प्रक्रिया होईपर्यंत समान काम समान वेतन द्यावे,या मागणीसाठी लोहारा तालुका ग्रामिण रुग्णालयातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि.18 एफ्रिल बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.या बाबत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर.यु.
सुर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,आम्ही अधिकारी व कर्मचारी लोहारा ग्रामिण रुग्णालयात गेली 10 ते 12 वर्षापासुन विविध पदावर राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियांनातर्गत अत्यंत तुटपुंज्या मानधवर काम करीत आहोत.आयुक्त सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी पुनर्नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करुन पुढील नियुक्ती फक्त सहा महिन्याचे देण्याकरीता कामावर आधारीत मुल्यांकन तयार केले आहे.या अन्यायकारक निर्णयाविरुध्द व संघटनेचे प्रसंबित मागण्या संदर्भात संपुर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी दि.18 एफ्रिल पासुन आंदोलन सुरु करण्यात आले आहे.या आंदोलनात डॉ.अशोक राठोड,डॉ.आर.एस.गायकवाड,डॉ.आय.ए.शेख,डॉ.
ए.आर.मेश्राम,डॉ.ए.हलसे,औषधनिर्माता ए.एम.
बागवान,औषधनिर्माता के.एस.शिंदे,परिचारीका व्ही.
व्ही.लोंढे,परिचारीका ए.व्ही.साळुंके,समुपदेशक डी.
बी.बोर्डे,अधिपरिचारीका श्रीमती डी.जगदाळे,
सहभागी आहेत.