यवतमाळ प्रतिनिधी :- स्थानीय पेशवे प्लॉट निवासी विवेक नखाते यांनी आपल्या आईची तेरवी साजरी न करता त्या पैशातून शहरात पिण्यााच्या पाण्याचा पुरवठा सुरु केला आहे.या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल यवतमाळात त्यांचे कौतुक केले जात आहे.विवेक नखाते यांच्या आई पुष्पलता सुधाकर नखाते यांचे नुकतेच निधन झाले. दरम्यान त्यांचा मुलगा विवेक याने पारंपारीक रितीरिवाजाला फाटा देत तेरवीच्या पैशातून शहरात पिण्याचे पाणी वाटपाचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने अक्षयतृतीयाच्या पर्वावर टॅकरव्दारे पाणी वाटप सुरू करण्यात आले आहे.यवतमाळात आज तिव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरण चा पाणी पुरवठा तर चक्क विस ते पंचविस दिवसानंतर होत आहे. नेमकी हीच बाब हेरुन विवेक नखाते यांनी हा निर्णय घेतला. गुरुदेव युवा संघाकडे पाणी वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. या साठी लागणाारा खर्च विवेक नखाते हे करीत आहे. विवेक यांनी घेतलेल्या या निर्णयाचे समाजातून सुध्दा स्वागत होत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे.पैसे सार्थकी लागल्याचे समाधान तेरवी केली असती तर जवळपास तीस हजार रुपये खर्च लागला असता. एवढेच नव्हे तर जवळच्याच नागरीकांना जेवायला बोलवावे लागले असते. वास्तविक हे सर्व जन सधन असल्याने होणारा हा खर्च व्यर्थ ठरला असता. यवतमाळ शहरात आज नागरीकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे मी तेरविच्या पैशातून पाणी वाटपाचा निर्णय घेतला. काही लोकांनी यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला मात्र मी त्यांची समजूत काढली. आज माझी आई जगात नसली तरी अशा कामांमुळे तीचे आशिर्वाद सदैव आमच्या सोबत राहतील.
तेरवीच्या पैशातून नागरीकांना पाण्याचा पुरवठा नखाते परीवाराचा असाही स्तुत्य उपक्रम