किती दिवस कर्जाची भाकरं
खात राहणारं
आणि किती दिवस व्याजाचे
अश्रु गाळतं बसनारं
सावकार दारात फास घेऊन
ऊभा असतो
तो शेतीची आणि शेतकऱ्याची
दोघांची आब्रु घेतो
शेतकती तरं जगण्याला कंटाळुनं
जगं सोडुनं निघुन जातो
पण ती शेतीमाती
तशीच पडुन राहते
त्या सावकाराच्या दारातं
जखमा मोजीतं
वेदना देणारा फरामोश
माणुस आणखी दुसरं
काय देऊ शकतो
संजय धनगव्हाळ
