इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी येथील महात्मा बसवेश्वरांच्या याञा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत विविध गितावर राजभरातून आलेल्या कलाकारनी उत्कृष्ट नृत्याचा कलाआविष्कार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.या नृत्य स्पर्धेचा समारोप दि.17 एफ्रिल रोजी समूह नृत्याने करण्यात झाला. यावेळी विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते परितोषिकांचे वितरण करण्यात आले.जेवळी येथील महात्मा बसवेश्वरांच्या याञा निमित्त आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेच्या तीसऱ्या दिवशी दि.17 एफ्रिल रोजी समूह नृत्य  स्पर्धेचे उदघाटन येथील प्रगतशील शेतकरी शिवशरण वलदोडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई तोरकडे हे होते.यावेळी प्रमुख म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, पंचायत समितीचे माजी सभापती बुध्दीवंत साखरे, पंचायत समितीचे सदस्य व्यंकट कोरे,नागनाथ पाटील,श्रीनिसास बुर्रावर,बसवराज हावळे,अदि उपस्थित होते.अनेक वर्षापासून येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयापासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते.या प्रसंगी विविध संस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम होतात, प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही या यात्रेच्या सुरवातीला दि.15 ते 17 या कलावधीत तीन दिवशीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेा घेण्यात आल्या.यावेळी या स्पर्धेत राज्यस्तरावरील नामवंत कलाकार सहभागी झाले होते.यात लावणी,आराधी,गोंधळी,भरतनाट्यम, देशभक्ती गीत,रिमिक्स अशा विविध गितावर तरूणाईंचे पाय थिरकले.एका हून एक दर्जेदार नृत्य सादर करून उपस्थित रसिंकांची वाहवा मिळवली.
            स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाण- दि.15 एफ्रिल रोजीचा निकाल  बालगट (सोळा वर्षा खालील) वैयक्तिक नृत्य स्पर्धात प्रथम पारितोषिक- (विभागुण), दिशा सोनटक्के (सोलापूर) व निर्मिती धर्मअधिकारी (पुणे) द्वितीय - (विभागुण) दिप्ती नायगावकर (उस्मानाबाद), व अपर्णा पवार (लातूर) तृतिय- (विभागुण) समर्थ कोळी (जेवळी) व श्रषी राठोड (लातूर) यांनी पटकाविला.याच दिवशी बाल गट समुह नृत्य स्पर्धा पार पडली.यात प्रथम पारितोषिक- (विभागुण) एम के ग्रुप (लातूर), व लीटल ब्रॅाड वे (लातूर), द्वितीय - (विभागुण) ओनली गर्ल ग्रुप (जेवळी) व डीजे बॅाईज ग्रुप (जेवळी), तृतिय- वन टु वन प्लस ग्रुप (अक्कलकोट)
दि.16 एफ्रिल रोजीचा निकाल प्रौढ गटातील लावनी व वैयक्तिक नृत्य स्पर्धा पार पडली. यात - स्त्रीगटसाठी - प्रथम पारितोषिक- (विभागुण) दिपाली नायगावकर (उस्मानाबाद) व अनामिका अहिरे (बीड), द्वितीय (विभागुण)- , राजनंदिनी शेख (लातूर), व प्रणाली कासले (सावंतवाडी) तृतीय (विभागुण) - रोहीणी मुके (जेवळी), सोनाली राणे (सांवतवाडी). याच दिवशी पुरुषस गट (प्रौढ) लावणी व वैयक्तिक नृत्य स्पर्धा झाली. यात प्रथम पारितोषिक- - (विभागुण) सुब्बु गवळी (सोलापुर), व सुरज भोपी (लातूर), द्वितीय- (विभागुण) शुभम खोत (उस्मानाबाद) व दिनेश जाधव (लातूर) तृतीय अजय शर्मा (मुंबई)
  दि.17 एफ्रिल रोजीचा निकाल प्रौढ गटातील समुह नृत्य स्पर्धा पार पडली.यासाठी प्रथम पारितोषिक- (विभागुण) कला अविष्कार (तुळजापूर), व डी बॅाईज ग्रुप (सतारा) द्वितीय- (विभागुण) राजमुद्रा अकॅडमी ग्रुप (उमरगा) व देवी ग्रुप (तुळजापूर) तर तृतीय पारितोषिक - (विभागुण) वॅम्पायर ग्रुप (बीड) व फ्री एक्सप्रेशन ग्रुप (लातूर) यांनी पटकाविला आहे. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देण्यात आले.या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून रामचंद्र ढोबळे (लातूर) कला स्वामी (पुणे),राजेंद्र जाधव ( लातूर) श्रध्द हुल्लेनवरु (सोलापूर) यांनी काम पहिले.या तीन दिवसीय स्पर्धेचे सुत्रसंचालन  शिवशरण कारभारी यांनी केले.या कार्यक्रमास महिला व नागरीक मोठ्या संख्येमे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post