इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला दि.18 एफ्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलिंगाची पंचकलश पूजा रुद्रभिषेकाने सुरवात झाली.सकाळी सालाबाद प्रमाणे परिसरातील अनेक बैलजोड्यांची गावाततून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.यानंतर उत्कृष्ट पशूच्या पालकांनी पारितोषिके देण्यात आली.बैलजोड्यांची मिरवणुक हे यात्रेच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण असते.महात्मा बसवेश्वर जयंती येथे यात्रेच्या स्वरूपात साजरी केली जाते.तीन दिवास चालणाऱ्या या यात्रा मोहत्सवाची सुरूवात दि.18 एफ्रिल रोजी पाहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलींगाची पंचकलश पुजा,रुद्राअभिशकाने झाली.सकाळी आठ वाजता काशिनाथ स्वामी यांच्या घरी बसवेश्वरांच्या पाळण्याचा कार्यक्रम पार पडला.दहा वाजता परिसरातील पशु पालकानी आणलेल्या बैलजोड्यांची गावातील मुख्यरस्त्यावरुन सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी या पशुंना मोठ्या प्रमाणात सजविण्या आले होते. ही मिरवणूक मंदिर परिसरात गेल्या नंतर पशु प्रदर्शन पार पडले. यावेळी उत्कृष्ट पशुंच्या पालकाना
गटनीहाय प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिके देण्यात आले आहे. ही पारितोषिके या परिसरातील शेतकरी वर्गात मानाचे समजले जातात. कांही पशुपालक तर यात्रेत पारितोषिके मिळावी म्हणून पशुधन साभांळत असतात.
उत्कृष्ट पशुपालकांचे गटनिहाय नावे अशी - खिखिल्लार वयस्क बैल जोडी - प्रथम- शामसुंदर पाटील, द्वितीय शरण भैराप्पा, तृतीय- सूर्यदेव मोरे, खिल्लार बैल जोडीः प्रथम -प्रभूराज पणुरे ,द्वितीय- सचिन कारभारी, तृतीय- माणिक भोरे, खिल्लार खोंड जोडीः प्रथम-विलास कारभारी , द्वितीय - ताराचंद राठोड, तृतीय- हसन पाढंरे, खिल्लार खोंड (सिंगल)-प्रथम - बिपीन कारभारी, द्वितीय - रमेश पाटील, तृतीय- जयराज राजपूत, खिल्लार गायः प्रथम - गुणवंत कारभारी, द्वितीय अभय कुलकर्णी तृतीय- दत्ता मुखे, खिल्लाार कारवड प्रथम - हुसैन पांढरे, द्वितीय -दिलीप साखरे, तृतीय- तुकाराम शिंगाडे तर ज्वारी बैल जोडीः प्रथम - जी. के कारभारी, द्वितीय - बाबूराव राठोड, तृतीय- बाबूराव माळी, ज्वारी खोंड जोडीः प्रथम - शटप्पा चवले ,द्वितीय- दयानंद कारभारी, शिवा लिंबाळे,
तृतीय- संजय राचपूत, ज्वारी गाय प्रथम- लव्हू शिंगाडे, द्वितीय- ज्ञानराज खांडेकर, तृतीय- बुध्दीवंत साखरे, जरशी (संकरीत) बैलजोडीः प्रथम - रणवीर पाटील, द्वितीय - वैजीनाथ हावळे, तृतीय- निलाप्पा राठोड, जरशी गायः प्रथम - शिवलिंगप्पा धरणे, द्वितीय - बाबूराव माळी, तृतिय - अनिल शिंगाडे, जरशी कारवड - प्रथम- संजय सलगरे, द्वितीय- म्हळाप्पा रायभोगे, देवणी बैल जोडीः प्रथम अस्माईल शेख, द्वितीय- संगमेश्वर वलदोडो, तृतीय- संजय राजपूत, देवणी खोंड जोडी -प्रथम- महादेव मोघे, द्वितीय संभा घोडके, देवणी गाय - प्रथम - आपाशा गोवे, द्वितीय आण्णाप्पा भंडार कवटे, तृतीय- रहिम शेख घोडा- प्रथम- विलास कारभारी, मल्लीनाथ कांबळे, सुभाष हावळे असे आहेत यावेळी उत्कृष्ट पशु निवढीसाठी निरीक्षक म्हणून गुणवंत कारभारी, श्रीशैल कोराळे, सुर्यकांत पणुरे, महादेव होणाजे, बाबुराव माळी, शिवाजी शिंगाडे, राजू गाडेकर, श्रीशैल भैराप्पा व नागनाथ चवले यांनी काम पाहीले आहे. या नंतर पारितोषिक प्राप्त पशुंचे पशुपालकाकडून मंदिरापासुन आपल्या घरापर्यंत हलक्याच्या कडकडाट,गलालाची उदळन करीत मिरवणूक काढण्यात आली.