इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- प्युपील्स ऑलम्पिक असोसिएशन इंडिया मार्फत शिमोगा व बेंगलोर येथे दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील शिकई मार्शल आर्ट,कराटे, अथलेटिक आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात प्रथमेश सुरवसे याने सुवर्ण व रजत,कु संस्कृती जाधव हिने सुवर्ण,व रजत,विश्वरत्न गायकवाड याने सुवर्ण व कांस्य, श्रावणी मंडले हिने सुवर्ण व कांस्य,रुषांक ओवंडे याने 2 सुवर्ण, हर्षद मोरे याने सुवर्ण व रजत,धनराज श्रीगिरे याने 2 कांस्य,श्रुष्टी श्रुगिरे हिने सुवर्ण व रजत तर संस्कृती कोकाटे हिने सुवर्ण व रजत असे एकूण 8 सुवर्णपदक,7 रजतपदक,3 कांस्य असे एकूण 18 पदकांची लयलूट केली.तसेच महंमद बिस्मिल्ला मोमीन याने वैयक्तिक 3 सुवर्ण,1 रजत,1 कांस्य असे 5 पदक मिळविले.लोहारा शहरात हे सर्व यशस्वी स्पर्धकांचे आगमन होताच त्यांचे सप्तरंग मंगल कार्यालयामध्ये माजी ग्रामविकास राज्यमंत्री तथा औसाचे विद्यमान आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डी.सी.सी.बँकेचे माजी चेअरमन बापूराव पाटील,रामकृष्णपंत खरोसेकर,माजी जि.प. सदस्य दिपक जवळगे,पं.स.माजी सभापती आसिफ मुल्ला,उपसभापती सौ नमिता नितीन पाटील, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागन्ना वकील, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी पं.स.सदस्य दीपक रोडगे,काँग्रेस कमिटीचे लोहारा तालुका अध्यक्ष अमोल पाटील,लोहारा कृ.उ. बा.स.चे संचालक शंकर अण्णा जटे,नगरसेवक श्रीनिवास माळी,नगरसेवक आरिफ खानापुरे,
आयनोद्दीन सवार,कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी. पाटील,
युवक कॉग्रेस शहराधियक्ष हरी लोखंडे,विठ्ठल वचने पाटील,रौफ बागवान,तानाजी माटे तसेच स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव,डॉ.हेमंत श्रीगिरे,डॉ.सुनील मंडले,सतीश मोरे,दत्तात्रय कोरे,गोविंद कोकाटे, धोंडिबा ओवंडे,राजकुमार गायकवाड,शंकर जाधव सुदर्शन भारती,हारून हेड्डे, बिस्मिल्ला मोमीन तसेच कोच महम्मदरफी शेख,मार्गदर्शक मिस सविता जाधव,मिस वर्षा सुरवसे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वानीच यशस्वी विध्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
