इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- न्यु प्रेरणा विचार मंच व आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी येथील समता नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.भीम गीताच्या बहरदार कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन जयंती साजरी करण्यात आली.कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील खंडाळा येथील रमाबाई कला पथकाच्या वतीने भीम गीताचे बहरदार कार्यक्रम घेण्यात आला.शिवसेना लोहारा तालुका प्रमुख मोहन पणुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणून जिल्हा परिषद सदस्या शोभाताई तोरकडे,पं.समितीचे माजी सभापती आसिफ मुल्ला,मुरूम बाजार समितीतचे उपसभापती बसवराज कारभारी,उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, नंदाबाई बोदाडे,कोमल भालेराव,ग्रामसेवक एस.एस. बिराजदार,राजकुमार निकाळजे,अदि उपस्थित होते.
सायंकाळी चार वाजता तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची सजावट करून ढोल,ताशा,सनई व विविध वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत विविध कला पथकाचे सादरीकरण सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते.ही मिरवणूक बस स्टॉप मार्गे मुख्य रस्त्यावरून स्मृती चौक,बसवेश्वर चौक,दगडी चाळ मार्गे काढण्यात आली.
या जयंती उत्सव कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य गोविंद जेवळीकर,सुरेश दंडगुले,नामदेव सोनकांबळे, नामदेव बिराजदार,संगप्पा मुखे,पी.एस.बिराजदार,
यांच्यासह नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत माटे,उपाध्यक्ष लक्ष्मण गवळी,सचिव महेश गायकवाड,प्रविण माटे, बाळासाहेब कांबळे,अदिंनी परिश्रम घेतले.
