लोहारा शहरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे जिल्हा ग्रामविकास संयोजक जयंत पाटील यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:-  केंद्रीय ग्रामविकास पंचायतराज मंत्रालय भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पंचायतराज प्रशिक्षण पात्रता परीक्षेत उमरगा येथील रा.स्व.संघाचे जिल्हा ग्रामविकास संयोजक व राष्ट्रीय संर्वगीण ग्रामविकास संस्थेचे जिल्हा समन्वयक जयंत पाटील यशस्वी झाल्याने यांचा सत्कार सोहळा लोहारा तालुका स्वंयसेवक संघ व जनकल्याण समिती परिवारांच्यावतीने शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती तथा समाजसेवक दयानंद गिरी होते.यावेळी प्रमुख म्हणुन सत्कारमूर्ती जयंत पाटील,नगरसेवक श्रीनिवास माळी, जनकल्याण समिती व भारतमाता मंदिर प्रकल्प प्रमुख शंकर जाधव,धाराशिव जिल्हा बौद्धिक प्रमुख शहाजी जाधव,लोहारा तालुका संघचालक अशोकराव  पाटील,लोहारा तालुका कार्यवाह दत्तात्रय पोतदार, सहकार्यवाह दत्तात्रय दंडगुले,साहित्यिक तथा प्रा.यशवंत चंदनशिवे,शहर कार्यवाह विरेश स्वामी, गणेश हिप्परगेकर,श्रीशैल जटे,सहदेव काडगावे, माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी,संजय दरेकर,शिवराज झिंगाडे,बालाजी चव्हाण,सुदर्शन भारती,नागनाथ घोडके,व्यंकटेश पोतदार,युवराज जाधव,गणेश सूर्यवंशी,सिद्धेश्वर सुरवसे,दत्ता बासूदकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारतमाता मंदिर समितीच्या सदस्या सौ.सविता जाधव यांनी केले. तर आभार श्रीमती वर्षा सुरवसे यांनी मानले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post