तेल्हारा ता.प्रतिनिधी :- तालुक्यातील माळेगाव बा.द्वारे स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत लाभार्थी निवड करण्यात येऊन त्यापैकी 75 शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे व इतर लाभार्थी करीता बांधकामे सुरू आहे मात्र ग्रामपंचायत माळेगाव यांच्या द्वारे करण्यात आलेले 75 लाभार्थी यांचे वयक्तिक शौचालय बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेले आहे आणि ते नियमानुसार न करता ठेकेदारी पध्दतीने करण्यात आले आहे वास्तविक शासनाचे आलेल्या योजनेअंतर्गत अनुदान हे प्रत्येक लाभार्थी ला 12000 रु आहे मात्र संबंधितानी संगमत करून वैयक्तिक शौचालय बांधकाम हे निकशाप्रमाणे न करता ते 5000 ते 6000 खर्चात बनविले आहे त्यामुळे सदरचे बांधकाम तात्पुरते व कच्चे बांधकाम करण्यात आले आहे व वापरलेले साहित्य हे एकदम हलक्या दर्जाचे वापरले आहे लाभार्थ्यांच्या आज्ञानतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून बँकेचे पासबुक पैशे काढण्याची पावती सह्या अंगठे हे ठेकेदाराने स्वतःकडे घेऊन प्रतिज्ञालेख सुद्धा परस्पर केलेले आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असून ही शासनाची फसवणूक झालेली आहे ठेकेदारासोबत संबंधितांचे साथ संगनमत असल्याने पात्र लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे अशी माहिती आपणास 27-2-2018 रोजी लेखी तक्रार करून माहिती देण्यात आली होती यावर आपण मला संबंधित्यांचा माध्यमातून सहपत्र दिले होते सहपत्रावर आपण दिलेल्या तक्रारीची सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांला मागवूण तक्रार कर्त्याचे समाधान करण्यात यावे अशे सहपत्र मला दिले यावर मी आपणास संजय अढाऊ 16-3-18 रोजी आपण स्वतः माळेगाव बाजार येथील शौचालयाची बांधकाम परिस्थिती पाहण्याकरिता स्थळ निरीक्षण करावे व झालेल्या भ्रष्टाचारावर योग्य तो न्याय द्यावा करिता आपणास मी पत्र दिले होते यावर आपण कोणतेच निरीक्षण केल्याचे दिसून आले नाही
करिता आपणास शिवसेना तेल्हारा तालुक्याचा वतीने निवेदनाद्वारे स्मरणपत्र देत आहोत आपण यावर माळेगाव बाजार येथील झालेल्या भ्रष्टाचाराची लवकरात लवकर चौकशी करावी अन्यथा तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे आंदोलन छेडण्यात येणार या करिता सर्वस्वी जवाबदारी प्रशासनाची राहील संजय पांडुरंग आढाऊ उपतालुका प्रमुख प्रवीण वैष्णव प्रसिध्द प्रमुख निलेश मूहरेकर उप श प्रमुख विवेक खारोडे राजेश वानखडे माजी श प्र. अजय गावंडे सचिन मोरे संतोष राठी आशिष शेळके श्याम राहतोळे रमेश इंगळे सुधाकर गावंडे संतोष साबळे यांच्यासह शहर व तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
