इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील नागरिकांनी एकत्र येवुन लोकवाचनालयात बैठक घेवुन सर्वच राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी एकत्र साजरा करण्याचा धोरणात्मक निर्णय दि.3 एफ्रिल रोजी घेतला आहे.या निर्णयामुळे एक नविन विचारमंच निर्माण झाले आहे.
*नवे पर्व,एकच सर्व*
हा विचारमंच निर्माण झाला.
व या *विचारमंचाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा बस्वेश्वर महाराज यांची जयंती एकत्रितपणे साजरा करण्याचा उपक्रम ठरविण्यात आला आहे.
शहरातील नागरिक सर्व प्रथम एका व्यासपीठावर आले आहेत.हा ऐतिहासीक निर्णय आहे.आपला एकोपाच्या वटवृक्ष वाढविण्याचे कार्य सर्व नागरिकांनी आज केले.या बैठकीला *जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.व तरुण वर्गांनी ही याला उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
या सर्वच जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी व्यंकटराव घोडके* उपाध्यक्ष पदी निळकंठ कांबळे, सचिन माळी,मंगेश बनशेट्टी,सचिवपदी श्रीनिवास माळी,सहसचिवपदी गगन माळवदकर,हरी लोखंडे, खजिनदार पदी विरेश [तम्मा] स्वामी,प्रसिद्धी प्रमुख पदी दिपक रोडगे, प्रकाश,अंकुश परीट,सहदेव काडगावे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.या बैठकीस रवि पवार,लक्ष्मण सगट,किरण कांबळे,गणेश कमलापुरे,अमित बोराळे,शशांक पाटील,सुमित झिंगाडे,तानाजी माटे,सचिन ठेले, विजय पाटील,स्वप्निल माटे,एस.बी.गायकवाड,एन.
जी.वाघमारे,दगडु चिकटे,अमोल माळी,मारुती रोडगे,
यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

