भारीप बहुजन महासंघ मुर्तिजापुर तालुक्याच्या वतीने तहसिल कार्यालय समोर महाराष्ट्र शासनाला झोपेतुन जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन



अतुल नवघरे
लाखपुरी: ३, भारीप बहुजन महासंघ मुर्तिजापुर तालुका, महीला आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तहसिलदार मुर्तिजापुर यांना भारीप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाच्या आदेशाप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रातील तहसिल कार्यालया समोर ३ एप्रील २०१८ रोजी दुपारी १२ ते ३ दरम्यान महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी  आंदोलन आयोजीत करण्यात आले होते. सदर घंटानाद आंदोलनामध्ये पक्षाच्या वतीने शासनासमोर विविध मागण्या पुढील प्रमाणे ठेवण्यात आल्या-


  •  भिमा कोरेगांव हल्ल्याचे मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करावी.

  • भिमा कोरेगांव हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवावरील सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावे.

  • ईतर मागासवर्गीय, भटके विभक्त,विषेश मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवुत्ती देण्यात यावी.

  • अ.जा. , अ.ज. विद्यार्थांची थकीत शिष्यवुत्ती तत्काळ अदा करावी.

  • टाटा समाजीक विज्ञान संस्था मुंबई येथील विद्याथ्र्यांच्या सर्व मांगण्या मान्य कराव्या.

  •  शेतक-याचा ७/१२ कोरा करण्यात यावा.

  •  मुर्तिजापुर शहर व ग्रामीण भागातील पाणी टंचाई भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.


या सर्व मांगण्याकरीता मुर्तिजापुर तहसिल कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र सरकारने आरोपीस अभय देण्याचे बेकायदा कामकाज बंद करून आरोपीला अटक करून अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, इतर मागासवर्गीय, विषेश मागासवर्गीय,भटके विमुक्त, अल्पसंख्यांक यांची शिष्यवृत्ती व शैक्षणिक अधिकार अबाधित राहतील असे निवेदनाव्दारे महाराष्ट्र शासनाला पक्षाच्या वतीने कळविले आहे.त्यावेळी निवेदन देतांना तालुका अध्यक्ष विनोदभाऊ नागे तालुका महासचिव संजय नाईक,शहराध्यक्ष बाळाभाऊ शितोळे, महीला आघाडी अध्यक्ष योगीता वानखडे,अंजली देशमुख, प्रधान गुरूजी, सम्राट डोंगरदिवे, संजय आष्टिकर, मोहण वसुकार, सौदागर खंडारे, पंडीत वाघमारे, सुनील सरदार, रमेश मेसरे , राहुल तायडे ,रामेश्वर जामणीकर, रविंद्र इंगळे, भैयासाहेब तायडे, श्रीकृष्ण खांडेकर, संजय तायडे,किशोर टाक,वामनराव डांगे, अमोल राकोंडे, कैलास मालवे, सुभाषराव सगने, शेख इम्रान,सुनिल सरोदे, मोहण रोकडे, देवानंद जामणीक, सुभाष सगने, डिगांबर साउतकर, भाउसाहेब सिरसाट,नानाभाउ मेहेर, प्रा. एल.डी. सरोदे,अतुल नवघरे, अरून वानखडे, इम्रान खान, अशोक लोडम, बबन भालेराव,दादाराव ढोके, विक्की गवई, धम्मानंद दहातोंडे, राहुल वाकोडे, सुशिल सिरसाट, विष्णु पावडे, राजमल गवई,संजय वानखडे, बाळासाहेब ठोकळ,शेख मुख्तार, उज्वल सोळंके, कांता साळुंखे, सुनिता उघडे, शोभा तांबडे,उषा सोळंके, शिला तांबडे, सुनिता इंगळे, शोभा जामणिक, बेबीताई चव्हाण, प्रतिभा वाकोडे, सुनंदा इंगळे,शितलताई सिरसाट ई. भारीप बहुजन महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post